माझा मूळचा हेतू वैज्ञानिक मंडळीही असल्या वाभरट गोष्टी करीत असतील तर त्याबद्दल नाखुषी दर्शवणे हा होता. या विषयाचा अमिताभ बच्चन यांच्या आजारपणाशी संबंध नाही असे मला वाटले. तो असेलच, तर मी

(१) मशिदी-दर्ग्यात होणाऱ्या प्रार्थनांना माझा मन:पूर्वक विरोध आहे हे जाहीर करतो.

(२) हज यात्रेबद्दल न बोलणाऱ्यांना माझा मन:पूर्वक विरोध आहे हे जाहीर करतो.

(३) पंढरपूरच्या वारीबद्दल काहीच्या बाही बोलणाऱ्यांना माझा मन:पूर्वक विरोध आहे हे जाहीर करतो.

(४) "मनःपूर्वक विरोध" पुरणार नसेल तर मी ही कृत्ये निंदास्पद, गर्हणीय आणि त्याज्य आहेत असे जाहीर करतो.

जी माणसे आयुष्यात आपल्या बोलण्यात "देवाशपथ, अरे माझ्या देवा, सोडव रे देवा, दैवी देणगी,  या अल्लाह, दैवदुर्विलास, गणपती बापा मोरया"  असले प्रयोग म्हणत नाहीत त्यांनी वैज्ञानिकांना नावे ठेवावीत.

तसेच, मी माझ्या बोलण्यात "देवाशपथ, अरे माझ्या देवा, सोडव रे देवा, दैवी देणगी, या अल्लाह (हा बाटगा कुठून घुसला मध्येच?), दैवदुर्विलास, गणपती बाप्पा (बापा नव्हे) मोरया" असले प्रयोग म्हणत नाही असे जाहीर करतो.  शिवाय, "इन्शा अल्लाह, god willing, भगवंताची/ईश्वराची मर्जी" हे प्रयोग मी म्हणत नाही असेही जाहीर करतो.

आता तरी मूळ विषयावर यायला हरकत नाही असे वाटते.