खगोल शास्त्रज्ञांनी ज्योतिषाद्वारे चांद्रयान सोडण्याचा मुहूर्त जर खरंच शोधला असेल
नाही. तसे नाही. चांद्रयान सोडण्याची वेळ (शास्त्रीय पद्धतीने) ठरविल्यानंतर, ही वेळ मुहूर्ताच्या दृष्टीनेही योग्य आहे असे शास्त्रज्ञांमधल्या काही ज्योतिषांनी जाहीर केले अशी बातमी आहे. (मोहीम यशस्वी झाल्यास, मुहूर्तावर उड्डाण केल्यामुळेच ती यशस्वी झाली हा दावा करता येईल). प्रतिकृती तयार करून वाहण्याचे काम कोण करते, याबद्दल बातमीमध्ये किंवा जालावर इतरत्र काही महिती मिळू शकली नाही. तरी हा प्रकार या संस्थेच्या नकळत केला जात असेल याची शक्यता कमी वाटते.
वैज्ञानिक मंडळींनी कुठल्याही गोष्टींबाबत श्रद्धा बाळगू नये असे मलातरी वाटत नाही. सश्रद्ध/अश्रद्ध असणे हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. मात्र वैयक्तिक श्रद्धा/अंधश्रद्धा या आपल्या व्यवसायाच्या पूर्णपणे विरोधात असतील तर त्याचे जाहिररित्या प्रदर्शन न करण्याची जबाबदारी या शास्त्रज्ञांची आणि त्याहून जास्त या संस्थेची आहे.
जाता जाता: भारतीय शास्त्रज्ञ आणि धार्मिकता या विषयावर दुवा क्र. १ हा लेख सापडला.