राज ठाकरे राजकारण करतो आहे, मराठी माणसांची आपल्या पक्षासाठी मते मिळावीत म्हणून हे सर्व चालले आहे हे म्हणणारी माणसे डोळ्यावर कातडे आणि कानात बोळे घालणारी आहेत. राज हा राजकारणी नाही, तो जे करतो आहे ती समाजसेवा आहे गृहीत धरा आणि सगळ्या प्रश्नांचा खुलासा होईल. संपूर्ण भारतात नेहरूंच्या काळापासून आजतागायत मराठी माणसांना, मराठी संस्कृतीला, मराठी भाषेला आणि मराठी नेत्यांना काडीइतकीही किंमत दिली गेलेली नाही. आज राज ठाकरे या प्रतिशिवाजीसारख्या माणसाने ती किंमत लढून मिळवण्याचा एकाकी प्रयत्न सुरू केला आहे, त्याला साथ द्यायची सोडून महाराष्ट्राच्या नेत्यांच्या षंढत्वाचे जे समर्थन करतात ते महापाप करत आहेत. राजच्या पक्षाला अजून मान्यता मिळालेली नाहे, त्यामुळे त्याच्या उमेदवारांना पक्षाच्या नावाखाली विधानसभेची निवडणूक लढवता येणार नाही असे, शरद पवार म्हणाले आहेत. त्यामुळेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर बंदी घालता येणार नाही असे त्यांचे मत आहे.
छत्रपती शिवाजीनंतर राज ठाकरे हा एकमेव त्या दर्जाचा माणूस महाराष्ट्रात जन्माला आला आहे. नतद्रष्टपणा करून त्याला विरोध करू नका.
लुटालूट-जाळपोळ केल्याशिवाय न्याय मिळत नाही हे आपल्या देशात प्रत्यही सिद्ध होत आहे. भाषावार प्रांतरचना आंध्रप्रदेशात दंगली झाल्या म्हणूनच करण्याचे आश्वासन नेहरूंना द्यावे लागले एरवी त्यांची मते--हैदराबाद, जुनागड, गोवा, पॉन्डिचेरी, काश्मीर यांच्या स्वतंत्र संस्कृती आहेत, त्यांना धक्का लावू नका--अशीच होती. आचार्य अत्रे नसते तर महाराष्ट्राचा जन्मही झाला नसता. अनेक पिढ्यानंतर एखादा दिग्विजयी पुरुष जन्माला येतो तसा आता आलेला आहे, त्याला तमाम मराठी जनतेने पाठबळ द्यावे. मनसेने जर महाराष्ट्रात जाळपोळ केली तर बिहारमध्ये कोण करते आहे? बिहारमध्ये दोन दिवसात राष्ट्रीय संपत्तीचे जेवढे नुकसान झाले आहे तेवढे महाराष्ट्रात १० वर्षात झालेले नाही. अर्थात जाळपोळ टाळायची असेल तर एकच मार्ग--अन्याय करू नका.
आज नारायण राणेंनी राजला पाठिंबा दिला आहे, उद्या छगन भुजबळ आणि अनेक कॉंग्रेस नेते देतील. विलासराव देशमुखांचा मनातून राजला पाठिंबा आहे हे लपून राहिलेले नाही.
गेले ४० वर्षे शिवसेनेने रेल्वेच्या भरतीच्या जाहिराती मराठी वर्तमानपत्रात येत नाहीत, याबद्दल सनदशीर मार्गाने आरडाओरडा आणि निवेदने दिली आहेत, त्याला आजपर्यंत रेल्वे मंत्रालयाने वाटाण्याच्या अक्षता दाखवल्या आहेत हे कितीजणांना माहीत आहे? उलट या जाहिराती फक्त हिंदी वर्तमानपत्रांत आणि हिंदी मुलखांतच प्रसिद्ध कराव्यात अशी सूचना मंत्रालयाने आपल्या अधिकार्यांना १९९६मध्ये दिली होती, हे नुकतेच सामनामध्ये वाचले. आताही लल्लू प्रसाद यादव यापुढे महाराष्ट्रातून रेल्वेभरती होणार नाही हे दररोज जाहीरपणे सांगत आहेत. तेव्हा सनदशीर मार्गाने कोणतेही प्रश्न सुटत नाहीत हे ध्यानात ठेवावे. तसे असते तर बेळगाव-कारवार आणि काश्मीरचे प्रश्न सुटले असते. वसंतराव नाईक म्हणत कोणताही प्रश्न सोडवायची घाई करू नये. दुसरा प्रश्न उभा करावा, पहिला आपोआप विसरला जातो. महाराष्ट्र सरकारने हेच धोरण आज अनेक वर्षांपासून चालवले आहे.