-राज ठाकरेच नक्की कुठे आणि काय चुकलं?

१) जे महाराष्ट्रात वर्षानू-वर्षे राहतात त्यांना मराठी यावं असे म्हणणे गैर आहे का ?
२) कनिष्ठपदांच्या नोकऱ्यांमध्ये स्थानिक बेरोजगारांना प्राधान्य मिळावे ह्यात काही गैर आहे का ?
३) अनेकदा चर्चा करून, मागण्या करूनही जेव्हा कस्टम, रेल्वे इ इ मधले भैय्ये भिख घालत नाही, अश्यांवेळी कधीतरी आंदोलन उग्र होणारच.
४) कल्याण स्टेशनवर शेकडो भैय्ये परीक्षा देण्यासाठी आले होते. त्यांना हुसकून लावायला गेलेले मनसेचे कार्यकर्ते इनमिन १०-१५, आता ही १०-१५ माणसे शेकडो लोकांना मारहाण करून खरंच पळवून लावू शकतात का ?
५) फक्त "भय्या" मिडीआ एक बातमी फुगवून-वाढवून परत परत दाखवते ह्याचा अर्थ ते जे काही बरळता आहेत ते सगळेच खरे मानून राजच्या आंदोलनाची पद्धत चुकीची होती असे म्हणायचे का ?
६) फुल वाटून, गांधीगिरी करून हा प्रश्न सुटेल असे वाटते का ?
७) ह्या आधी कधी आंदोलने झाली नाहीत का ? त्यात बसेचच्या काचा ह्या आधी कधी फुटल्या नाहीयेत का ?
८) त्या परीक्षा द्यायला आलेल्या "विद्यार्थ्यांना" हात जोडून विंनंती करून, हा स्थानीय लोकांवर अन्याय आहे, कृपया तुम्ही परत जा, सांगितले असते तर ते गेले असते का ?
९) आत्तापर्यंत राजने एकदाही कोणी मुंबईतून निघून जावं असे म्हंटलेले नाही. फक्त "लोंढे" बंदकरा इतकच काये ते म्हणणे आहे.. त्यात काय चुक आहे ?
१०) मुलायम-मायावती-लालू ह्यांची व्हॉटबँक महाराष्ट्रात वाढू नये ह्यासाठी त्याची राजनिती तो करत असेल तर त्यात काय गैर आहे ?

हक्क मागून मिळत नसेल तर तो हिसकावून घ्यावा ! त्यात काहीही गैर नाही. तोडफोड, दंगली होतच असतात, ह्या काही राजने आजच शोधून काढलेल्या गोष्टी नाहीत. त्या आधीही होत होत्या आणि त्या उद्याही अश्याच चालू राहणार ! राज ठाकरे "समाजसेवक" नाही. मनसे म्हणजे कोणी NGO नाही. राजच्या राजकारणाचा उद्या मराठी माणसाला "त्रास" होईल आशी भीती बाळगण्याचे काहीही कारण नाही. स्थानीय लोकांना रोजगार द्या ह्या सध्या-सरळ मागणीचा संबंध "देशाचे पुढे तुकडे पडतील" शी लावणं ह्यांसारखा मोठा मूर्खपणा नाही. पण बहुतेक "बुद्धिजीवी" हे असलंच काही तरी करताना दिसता आहेत आणी मुख्य मुद्द्याला बगल देता आहेत. महाराष्ट्र देशापेक्षा मोठा अजिबात नाहीये. पण भैय्ये बिहार आणि उत्तरप्रदेश सुद्धा देशापेक्षा मोठे नाहीत. त्यांच्या आणि त्यांच्याच पाठिंब्यावर उभ्या असलेल्या केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे मराठी माणसाला मनसेच्या रूपात रस्त्यावर उतरावे लागते आहे. तुम्ही आम्ही कधीच रस्त्यावर उतरणार नाही. अश्यांवेळी किमान जे उतरले आहेत त्यांच्याबद्दल सहानभूती ठेवायला काय हरकत आहे ? उगाच कंटाळा आलाय म्हणून लोक रस्त्यावर उतरून पोलिसांच्या लाठ्या खाऊन .. घरी bore  झालंय म्हणून तुरुंगात जाऊन बसता आहेत का ?

मराठी माणसाने कधीतरी एखाद्यातरी मुद्द्यावर एक व्हावं ! पटत नसलं तरी "आपलीच माणसं" समजून निदान तोंडतरी बंद ठेवावं ! दरवेळीच मराठी माणसाला अक्कल शिकवायची काहीही गरज नाही.

मयुरेश वैद्य.