मागील काही घटनांवर नजर टाकली असता असं दिसून येत आहे की या सर्व प्रकरणां मध्ये चुकीची माहिती पसरविण्यात (टि.व्ही.) मिडिया पण जबाबदार आहे . उदा. बंदच्या दिवशी एका टॅक्सीची काच फुटलेली किंवा फोडताना वेगवेगळ्या (अँगलने ) कोनांतून दाखवणे... कुठेतरी जळत असलेला टायर धुरांच्या लोटांसह असा दाखवायचा की संपूर्ण शहरालाच आग लागली आहे. आणि त्या सोबतच्या बातम्या , " राज के गुंडोने.... ऐसा किया .. वैसा किया . .. त्या बातम्या बघून लगेचच दुसऱ्या शहरांतील नातेवाईकांचे चौकशी चे फोन सुरू , " तिकडे सारं काही ठीक आहे ना ? जर इथल्या (भारतातल्या) लोकांची अशी फसवणूक होत असेल तर भारताबाहेरच्या ( भारतीय ) लोकांच्या भावना मी समजू शकतो. त्यांची राज ठाकरें बाबत (मिडियामुळे )गैरसमजूत होवू शकते. त्यांना एकच सांगणे आहे की राज ठाकरेंनी कधीच महाराष्ट्राला भारतापासून वेगळा करण्याची भाषा केली नाही. उगीचच कुठल्यातरी फॉरवर्ड झालेल्या ईमेल्स वर विश्वास ठेवून " राज ठाकरे देशाचे पुढे तुकडे पाडतील" अशा गप्पा करू नयेत. घरातली कोळिष्टक साफ करताना अडगळीतली एखादी वस्तू पडली म्हणून कारे बाबा घर पाडायला निघालास काय म्हणणाऱ्यांनी जरा शांत व्हा. बाकी , " दरवेळीच मराठी माणसाला अक्कल शिकवायची काहीही गरज नाही " या मयूरेश च्या मतांशी सहमत.
अजय