" ..नमस्कार,
१) मयुरेश वैद्य शी सहमत... खरचं "राज" नावच्या वादळाला सत्ता आणि योग्य पाठींबा मिळाला तर अनाधिकृत गोष्टी चुटकीसारशी उडवून लावता येतिल.. सो वोट बैंक करणे गरजेचे आहेच.. ह्या वेळेस आपले मत फक्त "मनसे" ला !
"साले आपलेच लोक आपल्याला खातात ! अरे नाही तुम्हाला एखादा फटाकडा फोडता येत.. बाकिचे फोडतायत निदान टाळ्या तर वाजवा... ! एक नंबर मयुरेश.. !!
२) कौंतेय देशपांडे ! साहेब आपण महाराष्ट्राच काय तर देशाबाहेर राहताय हे कळले.. कारण आपल्याला राज ह्यांच्यावरील बातमीपत्र तिथे वाचायला मिळाले असेल परंतु त्याची पार्श्वभूमी जाणून घ्यायचा क्रुपया प्रयत्न करावा..मराठी वाहिन्यांवरच कळेल ते.. किंबहुना रोज जे घडत आहे ना ते जगलात तर'च कळून येईल कि घराला झाकून टाकणारी मोठी आणि किळसवाणी कोळिष्टके काढायची असतील तर घराचा थोडा भाग जाळून नंतर पुन्हा रंगवावा लागतो !!
न पटणारे मेल्'स क्रुपया पाठवू नका.. तुम्ही त्यांचा धिककर करण्याचा उत्तम मार्ग वचताक्षणी डिलिट करणे..
३) जिंक्स.. ! महाराज, आधी आपण प्रेमाने'च सांगीतले होते.. कि बाबांनो मराठी पाट्यांचा कायदा आहे तो पाळा.. लावा मराठी पाट्या...आपल्या घटने'ट प्रांतवार नोकरभरती चा मुद्दा आहे.. त्यामुळे स्थानिकांना प्राधान्य द्या.. पण नाहि'च ऐकत म्हणल्यावर आपण स्वतःच्या पोराला देखिल कानफटात मारुनच समजावतो ना ? का पोलिसांच्या विनवणी करून त्यांनी तुमच्या बाळाला धाक दाखवून समजावण्याची वाट पाहतो ? सरळ साधा प्रश्न आहे.. ज्याला पोलिसांनी/सरकारने तोलून धरणे अपेक्शित होते पण, ते कचरा साफ करत नाहित म्हणून आपण कचऱ्यात झोपायचे का ? मग देवानी दोन हात-पाय कशाला बर दिले असावे ?आणि राहिला विषय संवेदनांचा - उद्या आपल्या वडिल-आईला पोलीस विनाकारण १०० गुन्हे आणि ५० कोर्टात बोलावत असेल तर आपण काय फक्त राम नाम घेत बसू का ? तिथे हर हर महादेव म्हणायलाच पाहिजे !!
४) या असल्या प्रादेशिक, भाषिक, जातीय, अस्मितांचा सुजाण भारतीयांनी निषेध केला पाहीजे. आणि सर्वांनी मिळून कॉमन शत्रुचा (दहशतवाद, अनारोग्य, गरीबी, साक्षरता ) विऱोध केला पाहीजे, वयं पंचाधिक शतम --
विटेकर काका..अहो ईतके दिवस फक्त विरोध/निषेध'च केलाय कि.. पण नुसतच सिनेमाच्या तिकिट खिडकीपर्यंत जाउन होउस्फुल्ल चा बोर्ड पाहून परत यायच हे आपण/आपली मुल-बाळं/नातवंड/पतवंड किती पिढ्या करायचं ? तुमचा "ऊद्या" घडवण्यासाठी "आज" मेहनत घ्यावीच लागेल ना..
५) केवळ खटला दाखल केला म्हणून महाराष्ट्राला वेठीस धरणे -- कलंत्री शेठ, केवळ खटला नाहिये हो.. चुकीचा, आणि अनेक ठिकाणी लावलेला खटला.. त्यातून संचारबंदी, सभाबंदी, भाषणबंदी, मिडिया प्रसिद्धी बंदी... हे सगळ्याचा एकत्रित राग म्हणून महाराष्ट्र वेठीस... ! तुमचा प्रश्न सरकारलाही(च) लागू होतो.. जर खरचं खटला योग्य आहे तर एकाच ठिकाणी का नाही ?
"राज ठाकरे आगे बढो... हम तुम्हारे साथ है ! .. आणि ह्या वेळेस च्या निवडणुकिच्या तयारीला आत्तपासुनच लागा... सर्व मराठी मते एकाच ठिकाणी गेली पाहिजेत जेथून आपल्याला मदत होउ शकेल.. आपल्या कॉलेज/कंपन्यांनमध्ये देखिल प्रयत्नपुर्वक मने वळवा.. आणि दाखवून द्या.. "महाराष्ट्र कोणाच्या बापाचा ते... " !! जय हिंद, जय महाराष्ट्र !!