सार्वजनिक रीत्या मालमत्तेची नासाडी ही दुर्दैवाची बाब म्हणायला हवी. मग कोणीही ती नासाडी करो
त्याचा एकमुखाने निषेध करायलाच हवा. प्रत्येक मनसे आंदोलनात मोठ्या प्रमाणात बेस्ट बसेसचा चुराडा
होतो. चालक / मालकांना मारहाण होते. ते भय्या नक्कीच नसतात तर ज्या मराठी माणसासाठी राज
आंदोलनाची भाषा बोलत आहेत त्याच मराठी माणसांपैकी एक असतात. गेल्या वेळी नाशिकमध्ये मनसेने
केलेल्या दगडफेकीत एका मराठी कामगाराचा मृत्यू झाला होता.
शिवसेना प्रत्येक आंदोलनात नीता ट्रॅव्हल्सच्या व्होल्व्हो जाळते कारण ती राणेंची वाहतुक कंपनी आहे. प्रत्येक ठिकाणी राजकारण आणून नासधुस केलीच पाहिजे का?
अनेक ठिकाणी एस्टी, ट्रक, गाड्या, आगगाड्या जाळल्या जातात. पूर्वी युवा काँग्रेसचे अधिवेशन
झाले की अधिवेशन स्थळाच्या आसपासची दुकाने हमखास लुटली जात असत. हे पर्यायाने राष्ट्राचे
नुकसान नाही का? आंदोलकांना आवरणे नेत्यांची जबाबदारी नाही का?