जबाबदारी घेणे हे एवढे सोपे असते का ? जेवढ्या आग-पाखडीने संसदेत हे उ. प. बिहारी नेते "राज ला अटक आणि फाशी ची मागणी करत आहेत.. तेवढ्याच "जबाबदारीने" जर त्यांना ह्या प्रकरणात संरक्षण प्रतिनिधी (पोलिस) म्हणून नेमले तर ते सार्थ करू शकतील का ??

"जबाबदारी"बद्दल फक्त तोंड उघडणे सोपे असते.. पण ती जबाबदारी घेणे आणि सार्थ करणे ह्यात फरक असतो.. आणि माझ्या मते सध्या मुख्यमंत्रि/उप. मु. /पोलिस अधिकारी/सरकार.. कोणाही मध्ये एवढी ताकद नाही कि ते महाराष्ट्रातल्या लोकांना समजावू शकतिल.. कारण "मराठी लोक" जरी भावनिक असले तरी कोणत्याही चुकीच्या मुद्द्याला चुकिचे स्पष्टिकरण मान्य करणार नाहित !!

मान्य आहे की जी तोड-फोड होते त्याचे पैसे आपल्याकडुनच घेतले जातात.. (टैक्स किंवा दरवाढ) पण हे एकदम थांबवणे अवघड आहे कारण ह्या गोष्टींचा मालकी हक्क सरकार कडे असतो.. त्यामुळे सरकार चा निषेध करण्याचा हा सोपा मार्ग आहे !( असे काही झाले कि सर्वसामान्य जनता अडचणीत येते ज्यामुळे त्यांना असे वाटते कि सरकार आपल्यासाठी काही करत नाहि.. आणि मग सरकार ला त्यामध्ये जास्त अन तत्परतेने लक्ष द्यावे लागते.. !!

काय बोलता मित्रांनो ?