भोराज ठाकरे त्यांच्या आंदोलनाबद्दल अनेक उदाहरणे देतात. शेजारील राज्ये कशी चुकीची वागतात हे सांगून आपल्याला ही तसेच वागायला सांगतात. राज म्हणतात की टी. चंद्रशेखर यांनी संपूर्ण आयुष्य महाराष्ट्रात प्रशासकीय अधिकारी म्हणून घालवूनसुद्धा ते निवृत्तीनंतर आंध्र प्रदेशात गेले असे म्हणत ते त्यांच्यावर टीका करतात. मात्र त्यावेळी मराठी माणसाने कुठेही गेले तरी सर्वप्रथम महाराष्ट्राचा विचार केला पाहिजे असे सांगतात. समोरच्या माणसाने आपल्याशी जसे वागू नये असे वाटते तसे आपण त्याच्याशी वागू नये अशा मताचा मी आहे.
आत्तापर्यब्त अनेक आंदोलनात बसेस फुटल्या म्हणजे मनसेला आंदोलन करून बस फोडायचा अधिकार मिळत नाही. एक चूक हजार जणांनी केली म्हणजे चूकीचे बरोबर होत नाही.
राजनी त्यांच्या कार्यकर्त्यांना बडवणे आणि फोडणे याशिवाय काहीच शिकवले नाही. आधीच डोके न वापरणाऱ्या कार्यकर्त्यांना ते अजून बिनडोक करत अहेत.
राजच्या आंदोलनामुळे परप्रांतील मराठी माणूस असुरक्षित झाला आहे. जेव्हा AIEEE सारख्या परीक्षा देण्यासाठी मराठी मुले भोपाळ किंवा इतर ठिकाणी जातील तेव्हा त्यांन्न भय्ये बडवणार नाहीत कशावरून?