वाईट मराठीचे रोज पहावे लागणारे उदाहरण म्हणजे कालनिर्णय दिनदर्शिकेवरील जाहिराती. कुठलीशी तेले, साबण, पेस्टा ह्यांच्या जाहिराती इंग्रजीतून अत्यंत सुमार दर्जाचे मराठी येत असणाऱ्या व्यक्तीने अनुवादित करुन छापलेल्या असतात असे वाटते. अगदी भातातील खडा टोचावा तसे ह्या जाहिरातीतील बोधवाक्ये खटकतात. जमले तर उदाहरणे देईन. रोजच्या वापरातील गोष्टी जसे दाताची पेस्ट, साबण, शांपू आणि सौंदर्यप्रसाधने जी केवळ जाहिरातीमुळे खपतात त्या बनवणाऱ्या कंपन्या जाहिरातीवर अमाप पैसे ओततात पण त्या स्थानिक भाषेत अनुवादित करताना हात इतका आखडता घेतात? बहुधा मराठी लोक ते चालवून घेतात म्हणून असेल.