५५१) टी. चंद्रशेखर यांनी संपूर्ण आयुष्य महाराष्ट्रात प्रशासकीय अधिकारी म्हणून घालवूनसुद्धा ते निवृत्तीनंतर आंध्र प्रदेशात गेले असे म्हणत ते त्यांच्यावर टीका करतात << ह्यात काहीही टिका नाही. "इतरांना जसा आपल्या राज्याबद्दल प्रेम-आपुलकी असते तशी मराठी माणसाला असण्यात काहीही गैर नाही" इतकेच तो सांगतोय. दुर्दैव असे की .. इतकं सगळं होऊनही मराठी माणसाला अजून हे सांगावं लागतं !
२) आप-आपल्या माणसांची काळजी जर शेजारची राज्य घेत असतील, तर त्यात काही चुक नाही. आणि महाराष्ट्रानेही तेच करावं असं राज म्हणत असेल तर त्यात चूक काय ?
३) आत्तापर्यंन्त अनेक आंदोलनात बसेस फुटल्या म्हणजे मनसेला आंदोलन करून बस फोडायचा अधिकार मिळत नाही<< नाहीच मिळत . पण मनसेने रेल्वे भरती संबंधित आंदोलनात बसेसच्या काचा फोडताच "तोडफोड विरोधी कायदा अध्यादेशाच्या रूपात "तातडीने" अमलात आणला जातो ! हे आर आर आधी झोपले होते का ?
४) राजनी त्यांच्या कार्यकर्त्यांना बडवणे आणि फोडणे याशिवाय काहीच शिकवले नाही. आधीच डोके न वापरणाऱ्या कार्यकर्त्यांना ते अजून बिनडोक करत आहेत. << हे प्रकार कोणत्या पक्षातली लोकं करत नाहीत ? मनसेच्या आंदोलनात पडलेले समोसे सर्व वाहिन्यांनी दाखवले आणि शिव्या घातल्यात.. पण त्या समोसेवाल्याच्या खिशात त्याचे पडलेले पैसे घालणाऱ्या मनसे कार्यकर्त्याबद्दल कोणीच काहीच बोलले नाही. मनसेने १ चूक केली की ती १००००० करून दाखवायची ( एकाच clip परत परत ) इतकंच काय हे मिडीआ करतंय
५) राजच्या आंदोलनामुळे परप्रंतातील मराठी माणूस असुरक्षित झाला आहे.<< आमच्या एका माणसाला जरी इतर राज्यात कोणी हात जरी लावला तर "त्यांची" बरीच माणसे महाराष्ट्रात असुरक्षित होतील .. हेही त्यांना कळायला हवंच.
नेहमी सर्वच ठिकाणी मोठमोठ्या गप्प्पा मारून, तत्त्वज्ञान पाजळायची वाईट सवय जोवर जात नाही, तोवर कितीही राज ठाकरे जन्माला येऊदेत .. मराठी माणसाच काही भलं होणार नाही. हाच राज जर .. UP बिहार वा तमिळनाडूत जन्माला आला असता आणि त्याने हेच केलं असतं तर ना त्याला मिडियाने व्हिलन बनवला असता .. न त्यावर आपल्याच लोकांनी इतके प्रहार केले असते.
असो .. सार्वजनिक मलमत्तेची तोडफोड होऊ नये हे मलाही पटतं. पण ते ह्या आधीही होतं होत ... आणि ह्यापुठेही असंच चालू राहणार ह्यात काहीही शंका नाही, हा काही आजच राजने शोधून काढलेला प्रकार नाही.
जाता-जाता : अति शहाणपणा पाजळणारी काही माणसं कधी कधी डोक्यात जातात. मी मागे एका प्रतिक्रियेत म्हणालो आहे तेच परत : कधीतरी तोंड बंद ठेवायला काय हरकतं आहे ??? हे सगळं करून राज सत्तेवर आला आणि त्याने काही चुकीचं केलं तर नंतरच्या निवडणूकीत लोक त्यालाही धाडा शिकवतीलच की, इतकी वर्ष फुकट गेली आहेत ... ५ वर्षांनी असा काय तो फरक पडणार आहे ?
मयुरेश वैद्य