वा हेमंत, लेखाचा विषय खूपच आवडला. लिहिण्याचा प्रयत्नही छानच आहे.

तुमचे स्वतःचे हस्ताक्षर खराब असेल तर ते त्या मुलांबरोबर बसूनच सुधारायचा प्रयत्न केलात तर त्यांना आकाश ठेंगणे होईल. चुका केवळ आपल्याच होतात असे नाही तर 'दादा', 'ताई' लोकांच्या पण होतात, हे त्यांना नवीन असते त्यामुळे हे त्यांना समजून आपणही मोठ्यांना मदत करू शकतो या भावनेतून त्यांना मिळणारा आनंद हा वेगळाच असतो. देवघेवीची ही योजना लहान मुलांबाबत अगदी हुकुमी लागू पडते !

दुसरे असे की काही जणं त्यांना होड्या, विमान बनवायला 'शिकवत' असताना तुम्ही त्या 'बनवून' देणे चुकीचे आहे, असे माझे मत आहे. बनवत असताना होणाऱ्या चुका सुधारायला मदत करणे निराळे आणि सरळ बनवून देणे निराळे.. नाही का?

इतर लोक सुट्टीच्या दिवशी दुसऱ्याप्रकारे मजा लुटत असताना त्याच वेळात असा जगावेगळा अनुभव घेऊन बघायची तयारी दाखवणारे लोक विरळाच, पण अर्थात त्यांना परतीत मिळणारा जगावेगळा आनंदही विरळाच. तुमच्या या प्रयत्नाचे करावे तितके कौतुक कमीच आहे. 'आनंदी' मुलांच्या दादाला यापुढील कामासाठी मनापासून शुभेच्छा.