चप्पल प्रमुख भूमिकेत आहे म्हणता. मात्र ती संपूर्ण कथेत 'अभावा'नेच आहे की!
ही कल्पना छान आहे. स्वतः नसण्याने (नसण्यामुळेच? ) चप्पल कथेची नायिका झाली!
तुम्ही फार सुंदरपणे ही कथा मांडली आहे.
मिलिंद जोशी ह्यांच्याशी सहमत. विनोदी लिहिणे - त्यातूनही नर्मविनोदी लिहून सुरवातीपासून शेवटपर्यंत पातळी सांभाळणे हे फार कठीण आहे. तुम्ही ते शिवधनुष्य समर्थपणे उचललेत. धन्यवाद आणि अभिनंदन.
-श्री. सर. (दोन्ही)