राज ठाकरे यांनी उचलेला मराठीचा मुद्दा हे राजकारण आहे असे समजणे म्हणजे आपण मराठी नसल्याचे लक्षण आहे. जी गोष्ट हिंदी आणि इंग्रजी माध्यमे गृहीत धरतात तीच खरी धरणे हा शुद्ध अडाणीपणा आहे.
मनसे हा मान्यताप्राप्त पक्ष नाही. त्यामुळे त्या पक्षाला चिन्ह नाही. त्या पक्षाच्या नावावर निवडणूक लढवता येणार नाही. आणि म्हणूनच सरकारची गोची झाली आहे. अस्तित्वात नसलेल्या मनसेवर बंदी घालता येत नाही. (असे शरद पवार नुकतेच म्हणाले आहेत.)
राज करतो ते राजकारण नाही. तो महाराष्ट्राची मान उंचावण्यासाठी जे काही करता येईल ते करतो आहे. ही समाजसेवा आहे. ह्यावर जो विश्वास ठेवेल त्याला वर उपस्थित केले आहेत तसले वेडेवाकडे प्रश्न पडणारच नाहीत.