महत्त्वाच्या विषयावरचे विवेचन. अभिनंदन.
मी स्वतः विपश्यनेचा दहा दिवासांचा कोर्स मरकळमध्येच केला आहे. तेथून परतल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले. ते प्रश्न तुम्ही या लेखमालेत उपस्थित केलेल्या प्रश्नांसारखेच आहेत. अर्थ जवळपास तोच.
या प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत हे वास्तव.
या संपूर्ण लेखमालेतून तुमचा विपश्यनेला "पर से' आक्षेप नाही हे स्पष्ट दिसते. तुमचा आक्षेप आहे तो गोएंकाप्रणीत विपश्यनेला. तो रास्त आहे. गोएंकाप्रणीत विपश्यनेतील (त्याच कोर्सवेळी) मला खटकलेली गोष्ट अगदी स्पष्ट होती. हा 'मी' तेथून गायब कसा होत नाही? मी भारतात विपश्यना आणली येथपासून ते अन्य अनेक बाबींमध्ये तो येतोच. विपश्यनेच्या सिद्धांतालाच त्यामुळे छेद जातो याकडे दुर्लक्ष कसे करता येईल? त्यानंतर पुण्यातच गोएंका आले होते. त्यावेळी साधकांमधले स्तर दिसले. हे स्तर साधकांच्या विपश्यनेतील प्रगतीनुसारचे नव्हते (खरे तर ते तसेही असू नयेत), तर त्यांच्या सार्वजनिक जीवनातील स्थानानुरूप होते. आजही ते तसे असतात. ते अनुभवल्यानंतर पुढे गोएंकाप्रणीत विपश्यनेबाबत इतर प्रश्न निर्माण होऊ लागले. ते आजही कायम आहेत. गोएंकाप्रणीत विपश्यना हे वास्तवात विपश्यनेचे पॅकेजडील आहे हे खरे वाटावे अशीच स्थिती आहे हे खरे.
पण एक आहे. तुम्ही अगदी मूलभूत पातळीवरून काही प्रश्न उपस्थित केले असले तरी, विपश्यनेचे तंत्र काही अंशी या कोर्समधून समजून घेता येते, असे माझे मत आहे (हे अर्थातच व्यक्तिसापेक्ष आहे - आणि माझ्या दोन मित्रांचाही तसा अनुभव आहे). हे तंत्र पूर्ण विपश्यनेचे नाही. एका विशिष्ट मानसीक अनुभूतीपुरते ते मर्यादित असावे.