'प्रायॉरिटी'ला अग्रक्रम म्हणणे म्हणजे ओळीच्या अग्रस्थानी आणणे आहे. म्हणजे रांगेतला पहिला नंबर. तो अर्थ नेहमी अभिप्रेत असेलच असे नाही. (असल्यास अग्रक्रम म्हणावे.) त्यामुळे प्राधान्य किंवा प्राधान्यक्रम हेच शब्द अचूक आहेत. खालच्या एका प्रतिसादात दिल्याप्रमाणे 'प्राथमिकता'मध्येसुद्धा प्रथम(आद्य) हा मूळ शब्द असल्याने तोही तितकासा योग्य नाही. प्रेफरन्ससाठी पसंती किंवा पसंतीक्रम. इथे प्राधान्य-प्रधानत्व(महत्त्व) या अर्थांचा काही संबंध नाही. प्रायॉरिटी देणे म्हणजे एखाद्या गोष्टीचे किंवा बाबीचे महत्त्व जाणून तिला न्याय देणे.
अर्थात, शब्दांच्या अर्थात एवढे काटेकोर असायचे काही कारण नाही. प्राधान्य, प्राथमिकता, अग्रक्रम आणि पसंती हे शब्द एकाच अर्थाचे समजून बोलताना हवे तसे वापरावेत. भाषा जेव्हा कायदेशीर हवी असेल तेव्हाच काळजी घ्यावी.