"भिंत खचली , कलथून खांब गेला" या सारख्या ओळींची आठवण आली. अर्थात, ही कविता पारव्याची नाही ; पावसाने (आणि बहुदा काळाने) जीर्ण केलेल्या वास्तूबद्दल आहे. म्हणूनच बहुदा "पारवा" मधील "उध्वस्त धर्मशाळा" ची आठवण येत राहते.
बऱ्याचदा अशा , खंडहरांच्या तुकड्यांच्या रेखाचित्रामध्ये त्या रेषा काढणारे हात दिसतात तसे या कवितेमध्ये झाले आहे.