'वरील जाड शब्द लिहिला आहे'  याचा अर्थ काय घ्यायचा? १.  वर जाड अक्षरातला अधोरेखित केलेला शब्द असाच जाड टाईपमध्ये अधोरेखित छापला आहे?  २.  मी जरी जाड अक्षरात दाखविलेला असला तरी देशोन्नतीमध्ये तो साध्या अक्षरातच पण चुकीचा छापला आहे? ३. देशोन्नतीच्या अंकात पुढील वाक्य आहे?: 'यातील काय योग्य बेपर्वाई की बेपर्वाहि?'   की  ४. यातील काय, 'योग्य बेपर्वाई' की (अयोग्य)बेपर्वाहि? ५.  शब्द जाड असेल तर कोणता हलका शब्द वापरायला हवा होता?  ६. लिही(!)ला होता की छापला होता?  ७. समजा असे वाक्य असेल की, 'तो मूर्खही आहे आणि बेपर्वाहि' तर यात 'हि' दीर्घ‌ऐवजी ऱ्हस्व लिहिला येवढीच चूक आहे. वगैरे वगैरे.

एवंच काय की, संदर्भाशिवाय आणि योग्य मराठीत अर्थपूर्ण वाक्यरचना केल्याशिवाय मूळ प्रतिसादावर अभिप्राय लिहिता येणार नाही.