सत्ता मिळवण्यासाठी नजिकच्या भविष्यात राज ठाकरे विधानसभेच्या/लोकसभेच्या निवडणूकीत किती ताकतीने उतरू शकतात आणि कोणत्या पक्षाबरोबर युती वगैरे करतात यावर हे ठरेल.
मनसेचे स्वःताचे निवडून येउ शकणारे लोक - शिवसेनेतून फुटताना जे लोक त्यांच्या बरोबर निवडून येण्याच्या क्षमतेचे आहेत तेच पुन्हा स्वःताच्या बळावर निवडून येउ शकतील. याचे प्रत्यंतर गेल्या महापालिका/नगरपालिकांच्या निवडणूकीतून दिसले.
महाराष्ट्रात येत्या निवडणूकीत जर त्रिशंकू अवस्था निर्माण झाली तर मनसे दबावगट निर्माण करून सत्तेत सहभागी होउ शकतो हा सत्तेत येण्याचा सर्वात जवळचा मार्ग असेल.
काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना-भाजप या ४ पक्षात सध्या महाराष्ट्र विभागला आहे. येत्या काही वर्षात जर राज ठाकरे यांची पक्षबांधणी केली तर राजकीयदृष्ट्या ते एक पर्याय ठरू शकतात.
सध्यातरी त्यांनी उचललेले मुद्दे शिवसेनेची मते खाउ शकतात हे नक्की. त्याचा फायदा काँग्रेस-राष्ट्रवादीला होइल के नाही हे सांगणे अवघड आहे.