आत्ता नुकत्याच आलेल्या नरेंद्र मोदींनी भिण्याचा इथे काही संबंध नाही. गुजराथ पुढारलेला आहे, तिथून मुंबईत माणसांचे लोंढे येत नाहीत. इथले गुजराथी बऱ्यापैकी मराठी बोलतात. गुजराथी झोपडपट्ट्या उभारत नाहीत. ते शस्त्रे बाळगत नाहीत, इथल्या मुलींना फूस लावून त्यांच्यावर बलात्कार करून त्यांचा खून करीत नाहीत. गुजराथ्यांप्रमाणेच कानडी, तेलुगू, आणि मद्रासी लोक आहेत. ते अनेक वर्षांपासून मुंबई-पुण्यात राहत आहेत आणि त्यांनी कधीही झांशी-मथुरा झांकी हैं, अब महाराष्ट्र बाकी हैं -अशा घोषणा दिलेल्या नाहीत.
एकाच कार्यालयात केन्द्र सरकारची नोकरी करणारे गुजराथी, पारशी, ख्रिश्चन, स्थानिक मुसलमान, सरदारजी आणि दक्षिणी भारतीय रोजच्या व्यवहारात कधीही गटबाजी करताना दिसत नाहीत. फक्त उत्तरी भारतीयच करतात. मराठी ही फक्त मोलकरणींची भाषा आहे ही त्यांची ठाम समजूत आहे आणि ते आयुष्यभर महाराष्ट्रात राहिले तरी मराठी शिकण्याचा विचारही डोक्यात आणत नाहीत, असा महाराष्ट्रातील लोकांचा अनेक वर्षांचा अनुभव आहे. राज ठाकरे याच्याविरुद्ध लढत आहेत. गोडीगुलाबीने, वाटाघाटी करून ते मराठी शिकणार नाहीत. त्यांना फक्त जबरदस्तीचीच भाषा कळते. असे केले तरच थोडाफार फायदा होईल. दुकानांवरच्या पाट्यांवर त्या त्या प्रांतातील भाषेत दुकानाचे नाव असणे आवश्यक आहे, हा कायदा सर्व प्रांतात पाळला जातो. फक्त महाराष्ट्रातच उत्तरी भारतीयांनी त्या कायद्याविरुद्ध मुंबईच्या उच्च न्यायालयात अपील केले आणि तोंडघशी पडले. परदेशी कंपन्या दक्षिणी भारतात जेव्हा आपली शाखा काढतात तेव्हा तिथले परदेशातून आलेले अधिकारी स्थानिक भाषा शिकून घेतात. फक्त महाराष्ट्रातच हे होत नाही, कारण आपले दिल्लीच्या तालावर नाचणारे सरकार!
तेव्हा गुजराथ्यांना हाकून लावण्याचा प्रश्नच नाही, उत्तरी भारतीयांनाही नाही. फक्त नवीन लोंढे घुसवू नका, इथे येऊन महाराष्ट्राचे अनहित होईल असे राजकारण करू नका, इथल्या संस्कृतीशी जुळवून घ्या आणि आपले सवतेसुभे उभारू नका. राज ठाकरेंची एवढीच माफक मागणी आहे. यात कुठलेही राजकारण नाही. ही महाराष्ट्राच्या जनतेच्या आत्मसन्मानासाठी व संस्कृतीरक्षणासाठी त्याने चालवलेली समाजसेवा आहे.
आज बसमध्ये मारलेल्या बिहारी माफियासाठी एकमेकांची तोंडे न पाहणारे उत्तरी भारतीय पुढारी एक झाले आहेत, पंतप्रधानांना भेटून महाराष्ट्र सकार बरखास्त करा म्हणून मागणी करत आहेत, आणि आपले लोक राज ठाकरे पैसा खाण्यासाठी हे उद्योग करतो आहे असे बिनबुडाचे आरोप करीत आहेत. थुः त्यांच्या जिनगानीवर!