मनसेने उभे केलेले उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसची मते नक्की खाणार.  राष्ट्रीय काँग्रेसची खाणार नाहीत, कारण त्या पक्षाची मंडळी   उत्तरी भारतीय, उत्तरी भारतीय अल्पसंख्याक आणि दिल्लीला विकले गेलेले बिनकण्याचे इतरेजन आहेत. त्यांना महाराष्ट्राच्या हिताची कसलीही पर्वा नाही. गेल्या साठ वर्षात एकही काँग्रेसजन महाराष्ट्रासाठी दिल्लीश्वराशी झगडलेला नाही.

मनसेचे उमेदवार शिवसेनेची मते खाण्याची दाट शक्यता आहे, पण कदाचित निवडणुकीपूर्वी मनसेची शिवसेनेशी युती होईल. भारतीय जनता पक्षाचे गोपीनाथे मुंडे यांना आता महाराष्ट्रात कोणीही विचारत नसल्याचे दृश्य महाराष्ट्रात हळूहळू दिसायला लागले आहे.  राजविरुद्ध चाललेली त्यांची बकबक आता बंद झाली आहे. त्यामुळे  भारतीय जनता पक्षाचे वैदर्भीय नेते सोडले तर कुणीही महाराष्ट्राचे भले करण्याची शक्यता नाही.  थोडक्यात कुठलाही राष्ट्रीय पक्ष महाराष्ट्राचे हित करू शकणार नाही.  जे आज दक्षिणी भारतात झाले आहे, तेच महाराष्ट्रात होणार!