राज ठाकरे काहीही चुकीच बोललेला नाही. हे सर्व मिडियाने उभे केलेले तमाशे आहेत. गुंडा"राज"  गुंडा"राज"  करता करता, त्याहूनही भयानक असे एक मीडिया-राज उभं राहतं आहे. प्रश्न गरीब भैय्यांचा नाही. पण जरा कुठे ही बस्तान बसताच ही मंडळी  गलिच्छ राजकारण सुरू करतात आणि प्रचंडप्रमाणात गटबाजीही. आजचे हे मीडिया-राज त्यावरच उभे आहे. मुळात

१) ऱाज ठाकरेने अमिताभच्या विरुद्ध काही ही "झहर उगलंलेल" नव्हतं.
२) आणि अगदी उगलंल असलंच तर त्यात काहीही गैर नाही. त्याला कारण त्याचे-त्याच्या बायकोचे असलेले समाजवादी पार्टीशी नाते. झहर उगलंलच असेल तर ते "राजकीय" होत, वैयक्तिक नाही.
३) गुजराथी, पारशी, शीख, दक्षिण भारतीय वै. ह्यांनी कधीच महानगर पालिकेत त्यांची भाषा ( आणि त्या पाठोपाठ त्यांची माणसं ) घुसवायचा प्रयत्न केला नाही.
४) त्यांनी, गुजराथी, तमिळ चित्रपट मुंबईत "टॅक्स फ्री" करण्याची मागणी केली नाही.
५) आपल्या माणसांना नाक्या नाक्या वर बसवून जागा "हडप" केल्या नाहीत.

असो, ह्यावर बरंच लिहिता येईल. मुळात ह्या आणि अश्याच काही गोष्टींपासून लोकांचं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठीच राजला खलनायक बनवून जगासमोर त्याची गुंड अशी प्रतिमा निर्माण करण्यात आली आहे. ज्यांना मराठी कळतंच नाही त्यांच्या मनात ही गोष्ट बिंबवणे अगदी सोपे आहे. आणि त्यात मीडिया-राज पुर्णपणे यशस्वी झालाय. त्यातल्या त्यात निदान ( ते तसं करता आहेत म्हणून का होईना ) काही मराठी चॅनल्स राजला उचलून धरता आहेत ही आपल्या बाजूने थोडी जमेची बाजू !

१) त्या त्या राज्यात त्यात्या राज्यातील लोकांना "प्रेफरंस" देणं म्हणजे "देशद्रोह" नाही
२) ज्या गोष्टी इतर सगळेच करतात, आपण त्या करतं नाही म्हणून आपलं ( पर्यायाने मुंबईचं-महाराष्ट्राचं- आणि मग भारताचंही) नुकसान होतंय हे आपल्या लोकांना उदाहरण देऊन पटवून देणं म्हणजे "देशद्रोह" नाही.
३)मराठी माणसांना कशाच्या किंवा कुणाच्या तरी विरोधात रस्त्यावर उतरवण्यापेक्षा मराठी व्यवस्था उभी करण्याचा प्रयत्न हा करत नाही? << तेच तर करतोय ! मुळात राजच्या एका भाषणात "मराठी माणसाचा विकास कोणाच्या कानफटात मारून होणार नाही" हे त्याने बोलून झालंय ! पण त्याला प्रसिद्धी (आणि प्रतिसादही) शून्य !
४) राजचे आंदोलन रेल्वे भरतीबद्दल आहे, मुळात रेल्वे भरती हे "भय्यांसाठी" पैसे कमावण्याचं उत्तम साधन आहे. बिहारमध्ये जागा आपल्या नावावर करून लालू रेल्वेमध्ये लोकांची भरती करतो आहे. हे प्रकार मीडिया-राज उघड करतं नाही. त्यांना "राजने फीर उगला झहर" मध्येच इंटरेस्ट आहे.
५) रेल्वे भरतीबद्दल राजचे आंदोलन अगदी योग्य आहे. लालूच्या "धंद्या"आड राज येतोय म्हणूनच लालूचा इतका थतथयाट होतोय. आणि मिडिया-राजला हाताशी धरून लालू आपलाच धंदा सुरक्षित करतोय.

बाकी मीडिया-राज किती नालायक आहे आणि लोकशाहीचा हा ४था स्तंभ आतून TRP, पैसा, गटबाजीने किती खोलवर पोखरला गेला आहे हे आज मराठी माणसाच्या लक्षात येतं आहे. भारताच्या कधी येईल कोणास ठाऊक. 

असो !