वर्गीकरण पाहिले. सुधारणेला बराच वाव आहे. त्यात दिलेल्या पदार्थांची नावे(उदा. गोडाचे पदार्थ) अकारविल्हे असली पाहिजेत. ती तशी नाहीत. केवळ साबुदाण्याची खीर किंवा बेसनाचा लाडू असेच न लिहिता--'खीर-साबुदाण्याची' आणि 'लाडू-बेसनाचा' अशाही नोंदी हव्यात, म्हणजे शोधायला सोपे पडेल. याशिवाय हरबऱ्याच्या डाळीचे(किवा अन्य साहित्यापासून बनवलेले) पदार्थ असे वर्गीकरणसुद्धा हवे. एकच पदार्थ अनेक प्रकारे शोधता आला पाहिजे. हे सर्व पदार्थ 'शोध' म्हटले की शोधता आले पाहिजेत, त्यासाठी 'पाककृती' उघडण्याची गरज पडता कामा नये.
वर्गीकरण करणे फारसे अवघड नाही. प्रसिद्ध झालेली एखादी पाककृती कुठल्याकुठल्या प्रकाराने वर्गीकृत करता येईल ते पाहणे आणि त्या त्या वर्गात ती सुयोग्य मथळ्यानिशी उचित नोंद करून टाकणे हे काम सहज शक्य आहे. उदा. 'साबुदाण्याची खिचडी' हा मथळा (शिवाय नोंद) आणि 'खिचडी-साबुदाण्याची' ही अधिकची नोंद. हा पदार्थ उपवासाचे पदार्थ, साबुदाण्याचे पदार्थ आणि खिचड्या या तिन्ही प्रकारात नोंदला जाईल.