हा सर्व हिंदी आक्रमणाचाच एक भाग आहे. महाराष्ट्राला आपापसातील भांडणात गुंतवून ठेवायचे , घटना /देशाची एकता वैगरे गोष्टींची भीती घालायची आणि पाठिमागे आक्रमण चालू ठेवायचे असा डाव आहे. सत्य दाखवण्याची , निर्भिडपणाची भाषा करणाऱ्या आय्बीएन लोकमत मध्ये लोकांच्या प्रतिक्रियेसाठी साधा मेल पत्ता देण्याचे धाडस नाही. त्यांच्या वाहीनिवर एक तर हिंदी कार्यक्रमच दाखवतात (नाच गाणे, बिग बॉस ई. ) .बहुतांशी कार्यक्रमात /चर्चांमध्ये हिंदी बोलणारा नसेल तर त्याला वजन येत नाही किंवा आपला तथाकथीत निष्पक्ष पणा दिसत नाही असे संपादकांना वाटत असावे. त्यांच्या हिंदी/ईंग्रजी वाहीन्यांना वृत्तवाहीन्या का म्हणावे हा प्रश्नच आहे.