झाकिरभाईंच्या कार्यक्रमाला पहिल्यांदा गेल्यावर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. चैतन्य या शब्दाचा नेमका अर्थ जाणून घ्यायचा असेल तर झाकिरभाईंकडे बघावे. (इथे चैतन्यचे इंग्रजी प्रतिशब्द जसे की लाइफ किंवा स्पिरिट फिके वाटतात.) दुसरी जाणवलेली गोष्ट म्हणजे नम्रपणा. बर्‍याच कलाकारांमध्ये ऍटीट्यूड नावाचा जो प्रकार असतो तो इथे सापडत नाही. कधीही उदासीनता, आळस किंवा निराशा आली तर एक उपाय करून पहावा. झाकिरभाईंचा परफॉर्मन्स पहावा. या माणसात उत्साह इतका भरभरून वाहतो आहे की त्याची लागण तुम्हाला झाल्याशिवाय रहाणार नाही. एक झलक इथे पहा.

दुवा १

दुवा २

हॅम्लेट