अशा प्रकारे आदराचे स्थान असलेल्या व्यक्तिंबद्दल खळबळजनक मजकूर छापला

जाणे नवीन नाही. मुद्दा हा की सत्य बाहेर आल्यास त्या व्यक्तिविषयीचा आदर तसाच राहील का?

आपल्याला ते सत्य, त्यावेळचे संदर्भ आणि एकूणच त्या घटनेचे महत्त्व इत्यादी गोष्टी विचारात घ्यायला हव्या.

        व्यक्तीचे कार्य एका घटनेवर इतके अवलंबून असते हे मला पटत नाही‌.

        शिवाजी काय किंवा सावरकर काय; त्यांच्याविषयी काहीही सत्य बाहेर येवो आदर कमी होण्याचा(माझा तरी)

प्रश्नच उद्भवत नाही. आपली श्रद्धा डोळस असावी.

         मात्र हे खरे की अशा बातम्या किंवा माहिती देणाऱ्यांचा हेतू स्पष्ट व योग्य असावा अन्यथा त्यांना

पुरेसे शासन व्हावे कारण ते क्षम्य नाही.