जाता जाता : दुवा क्र. १ ह्या ठिकाणी मी आपला ब्लॉग थोड्याच वेळापूर्वी वाचला.  सदर ठिकाणी 
मनोगतवर प्रसिद्ध झालेल्या तुमच्या, माझ्या, रोहिणीच्या, मीसुचिच्या, रामची आईच्या....

भले शाबास! हिंदुपतपातशाहीचे असे वंशज पाहून अपार संतोष जाहला. संकेतस्थळ आणि अनुदिनीच्या तमाम लेखकांनो, ह्यातून काहीतरी शिका. का लिहीत नाही तर म्हणे इन्स्पिरेशन नाही, चांगला विषय नाही! भवानीमातेच्या कृपेने कंट्रोल व्ही आणि कंट्रोल सी सारखा सुलभ, जलद अन सोपा मार्ग उपलब्ध असताना हवी कशाला इन्स्पिरेशन? आवडला लेख, करा कॉपी आणि छापा!
आतापर्यंत एखाददुसरा लेख ढापणारे भुरटे चोर पाहिले होते. इथे पुरंदरच्या वाघाने आख्खी सुरतच लुटली आहे. इसकू बोलते जिगर!

हॅम्लेट