सावरकरांवर श्रद्धा असलीच पाहिजे किंवा असण्याची गरज नाही हा आग्रह लोकशाहीत कुणी कुणाला करू शकत नाही. त्याचप्रमाणे लोकशाहीत कुणीही काहीही छापू शकते व कुणीही काहीही प्रतिसाद देऊ शकते.
एखाद्याच्या मनात एखाद्या ऐतिहासिक माणसाबद्दल आदर असेल तर तो कायम ठेवण्यात अशा पत्रांमुळे अडचणी येण्याचे कारण नाही.
आणखी एक मुद्दाः आपल्यावर वेळ आली की माणूस काहीही निर्णय घेऊ शकतो याची उदाहरणे आहेत. 'ते सत्तर दिवस' मध्ये लोकांनी माणसांचीच प्रेते खाल्ल्याचे स्पष्ट झालेले आहे. शिवाजी महाराजांनी भर दरबारात संभाजी राजे हयात नाहीत असे मॉसाहेबांना मुद्दाम सांगीतले ( ज्याने फितुरांना ते हयात नाहीत असे वाटावे ) हे स्पष्ट झालेले आहे. त्यामुळे सावरकर त्यावेळी कुठल्या मनस्थितीमध्ये व परिस्थितीमध्ये होते यावर त्या प्रसंगाची सत्यासत्यता व शक्यता विसंबून असू शकते. ( मला असे म्हणायचे नाही की ते असत्य आहे ) उदाः एखाद्या माणसाला समजले की त्याला बोटीतून अशा ठिकाणी नेत आहेत जिथून त्याला पुन्हा त्याची मातृभूमी त्याच्या आयुष्यात दिसणार नाही किंवा त्याला मारून टाकणार आहेत तर तो निश्चित असा निर्णय घेऊ शकेल.
काही वेळा सार्वजनिक ठिकाणी असे प्रश्न चर्चेला घेऊन काहीतरी वाद उत्पन्न होऊ शकतात.
आपल्या आयुष्यात ज्या गोष्टींनी काहीही फरक पडू शकत नाही त्यावर वाद घालणे अयोग्य आहे. यात 'अभिमान, देशप्रेम,' वगैरे सर्व आले. मी असे विचारतो की ज्यांना या पत्रामुळे काही मनस्ताप झाला आहे त्यांनी आजवर सावरकरांच्या धर्तीवर स्वतः केलेले कार्य लिहून कळवावे. तेही सावरकरांच्या प्रेमामुळे केलेले असावे. उगीच कुणाला दत्तक घेतले, वृद्धाश्रमाला भेट दिली असे नको. हे सर्व म्हणताना मला सावरकरांबद्दल प्रचंड आदर आहे हे आधीच लिहितो. उगाच आपले घ्यायचा एक विषय, चघळायचा, दहा जणांना चघळायला लावायचा, आपली देशभक्ती व्यक्त करायची अन मग दुसरा विषय घ्यायचा ह्याला काहीही अर्थ नाही.
(काही भाग वगळला. : प्रशासक)