प्रसिद्धीचा हव्यास असणारे लोक अधून मधून भडक व सवंग विधाने करून जनतेचे लक्ष वेधून घेतात. विजय दांडेकरांचे विधान त्याच सदरात मोडते.  असल्या विचारसरणीच्या लोकांना प्रत्येक विषयात 
आपल्या ठाम मताची पिंक टाकायला आवडते.  असे करताना आपण राष्ट्रीय श्रद्धेचा अनादर करीत 
आहोत हे त्यांच्या लक्षात ही येत नाही.  

लाखो लोकांची श्रद्धास्थाने असणाऱ्या गोष्टींवर धुरळा उडवून मिळणारा आनंद हा निर्भेळ असू 
शकतो का?
  

असो.  अजून ५-१० वर्षांनी लोकांना विजय दांडेकर लक्षात ही राहणार नाहीत.  

मला स्वत:ला सावरकरांचे अस्पृश्यता निवारण आणि भाषा शुद्धिकरण हे दोन पैलू बेहद्द आवडतात. अधिक 
माहितीसाठी दुवा क्र. १ हे श्री.  प्रमोद भोपळे ह्यांचे संकेत स्थळ जरुर वाचावे.

(काही भाग वगळला. : प्रशासक)