दिवाळी केंव्हा सुरू झाली? कोणी सुरू केली? काही विशिष्ट इतिहास यामागे आहे का?
दिवाळीत येणारे सर्व महत्त्वाचे दिवस, इतिहासात (किंवा प्राचीन काळी म्हणा हवे तर) त्याच क्रमाने (म्हणजे एका पाठोपाठ एका दिवशी) आणि एकाच भूभागात झाले असतील असे वाटत नाहीत. उदा. वसुबारस कोठल्यातरी स्थळकाळाशी संबद्ध असेल. बलिप्रतिपदेची गोष्ट आणखी वेगळ्या स्थळकाळात झालेली असेल, भाऊबीज आणखी तिसऱ्या स्थळकाळात झालेली असेल ... इ. इ., असे मला वाटते.