राज ठाकरेंवर रिक्षा, टॅक्सींची मोडतोड केल्याचे कुठलेही आरोप ठेवण्यात आलेले नाहीत. किंवा यूपीबिहारी तरुणांना मारहाण केल्याबद्दल. आरोप फक्त प्रक्षोभक भाषणांबद्दल आहेत. त्यांच्या भाषणांत काही गैर असल्याचे अजून सिद्ध करता आलेले नाही, आणि ते येणेही शक्य नाही. 'सहारा महाराष्ट्रा'च्या 'आरके बजाज शो'त त्याची सर्व भाषणे अनेकदा दाखवतात. त्या भाषणांत काही प्रक्षोभक वाक्ये असती तर 'सहारा'ला ती भाषणे दाखवल्याबद्दल कोर्टात खेचता आले असते. तसे झालेले नाही.
एकूण काय राज ठाकरे राजकारण करत नसून समाजसेवा करीत आहे.