अमेरिकेत भारतीय लोक दिवाळी व्यवस्थित साजरी करतात. दिवाळी करता लागणारे सर्व सामान -

  1. बेसन, साखर, पोहे, फरसाण, सुका मेवा, मिठाई, मैदा, गूळ, वेगवेगळी पिठं, नारळ आणि बाकी फराळाकरता लागणारे किराणासामान अमेरिकेत मिळते.
  2. भारतीय पद्धतीचे नव्या आणि लेटेस्ट फॅशनचे कपडे मिळतात.
  3. पणत्या, समया, रांगोळी, रंग, दिवे, कंदिल हे देखील मिळते.
  4. फार आवाजाचे नसले तरी बिना-आवाजाचे फटाके सहज वाजवता येतात.

दिवाळी साजरी करण्यासाठी एवढ्या गोष्टी पुरेशा वाटतात.

दिवाळी किंवा त्यासारखे इतर संस्कृतीतील सण हे सुष्ट शक्तींचा दुष्ट शक्तींवरील विजय किंवा शेतीचा हंगाम संपून हिवाळा सुरू झाल्याने तो सुखकर व्हावा अशा हेतूने सुरू झाले असावेत. पौराणिक गोष्टींवरून दिवाळीच्या दिवसांची सांगड घालणे केवळ निमित्तमात्र आहे.