मौलिक विचार आहेत. राजकारण नसून समाजसेवा करत आहेत.
हे आपल्याला कुणी सांगीतले? श्रीमान, जगातील प्रत्येक माणुस ( जो संत नाही ) तो फक्त म्हणजे फक्त स्वतः साठीच जगतो.
समाजसेवा म्हणजे जी फुल्यांनी किंवा गाडगेबाबांनी केली ती! ठाकरे समाजसेवा करत नाहीत.
कुणीही निवडून आले तरी महराष्ट्राचे भवितव्य एखादा मुख्यमंत्री ठरवू शकत नाही. अख्ख्या राज्याचे भले वगैरे करण्याची क्षमता एखाद्या माणसामध्ये नसते. त्याच्याकडे फक्त निर्णय घेण्याचा अधिकार असतो. आपल्याला असे वाटते काय की राज ठाकरे सत्तेवर आले तर अचानक पाच वर्षात सर्व रस्ते उत्तम, अजिबात वीजटंचाई नाही, शेतकऱ्यांच्या आत्महत्या नाहीत, संपूर्ण राज्य सुशिक्षीत, प्रत्येक मराठी माणसाला रोजगार वगैरे असे होईल असे? असे काहीही नाही. त्यांना फक्त सत्तेवर यायचे आहे. मग शेवटच्या क्षणी सर्व कायदे बदलले जातील, युत्या केल्या जातील, सगळे काही होईल.
फक्त एक विचार करून पहाः असे मराठी भाषिक जे अत्यंत हुशार किंवा उच्च्पदस्थ आहेत त्यांना महाराष्ट्राबाहेर जाण्याची बंदी का केली जाउ नये? का त्यांनी परदेशात जाउन आपले भले करून घ्यावे? याचसाठी ना की त्यांच्यात तशी क्षमता व इच्छा आहे म्हणुन? त्यांना ठाकरे राज्याच्या अस्मितेसाठी इथेच का थांबवत नाहीत? की बाबारे तुम्ही हुशार आहात तर इथेच थांबा अन राज्याचे भले करा! नाही. तसे होणार नाही. मग आपाआपले बघण्याचा अधिकार फक्त मराठी माणसालाच का? बिहाऱ्यांना का नाही? तेही उन्नतीसाठी इकडे तिकडे जाणारच ना?
मुख्य मुद्दा वेगळाच आहे. ही अस्मिता कितीही अभिमानास्पद असली तरी त्यातून निर्माण होणारे विचार हे मुळातच बेकायदेशीर आहेत. देशाचे तुकडे पाडण्याचे मनसुबे आहेत. आपल्या घटनेमध्ये याला वावच असू शकत नाही. इथे येऊ नका हे आपल्याच लोकांना म्हणणारे आपण कोण? ठाकऱ्यांना जर राजकारणामध्ये स्थान नसते, ते जर व्यवसाय करत असते अन त्यासाठी त्यांना आपले बस्तान उदाहरणार्थ उत्तर प्रदेशात हलवावे लागले असते ( जसे टाटा मोटर्स ने जाण्याचा निर्णय घेतला ) तर ठाकरे ही अस्मिता घेऊन इथेच बेरोजगार अवस्थेत राहिले असते काय? गेलेच असते ना? आयुष्य माणसाला सगळे करायला लावते. सध्या ते ठाकऱ्यांना मराठी अस्मिता जपायला लावत आहे. उद्या मनसे हा पक्ष मोठा झाला अन यु पी च्या एखाद्या पक्षाशी हातमिळवणी करून राष्ट्रीय पातळीचे होता येतेय असे दिसले तर ते तसे करणार नाहीत काय? नक्की करतील. त्यावेळी त्यांना विचारले पाहिजे की अस्मिता कुठे आहे म्हणुन? शिवसेनेनेही भाजपशी युती केलीच. ( आधी मोठे ठाकरेपण शिवाजी पार्क वर मराठी मराठी म्हणुनच भाषणे द्यायचे). नंतर त्यांना देशाच्या राजकारणाचे वेध लागले.
तेव्हा, हा सर्व स्वार्थ आहे.