स्व. खानखोजे यांच्याविषयी एका लेखिकेचे मराठीत लिहलेले पुस्तक काही वर्षांपूर्वी वाचले आहे. एवढे अविरत कष्ट व दुर्दम्य इच्छाशक्ती असलेला हा क्रांतिकारक दुर्दैवाने फारच कमी लोकांना ठावूक आहे.

पुस्तकातला एक हृदयस्पर्शी प्रसंग म्हणजे जेव्हा ते मुंबईहून जपानला जायला निघणार असतात तेव्हा भूकेपोटी आईने दिलेले लाडू खातात, तर त्यातून आईने ठेवलेल्या सोन्याच्या बांगड्या निघतात. धन्य ती माता व धन्य तो पुत्र!

भारतमातेच्या या सुपुत्राला शतशः प्रणाम!