मुख्य प्रवाहात येण्यासाठी राज्यातील मुस्लिमांनी 'मायमराठी' आत्मसात केलीच पाहिजे, असे कळकळीचे आवाहनही त्यांनी केले. .
विलासरावांची ही कळकळ म्हणजे 'मगरीचे अश्रू' आहेत. मतपेटीवर डोळा ठेऊन केलेली एक सिद्ध झालेली, प्रमाणित झालेली खेळी. विलासरावांना 'कळकळ' वाटत असेल तर किमान महाराष्ट्रातील मदरसे त्यांनी बंद करून दाखवावेत? ते आपोआप मुख्य प्रवाहात येतील.
'हाज'ला सवलत दिल्याने, त्याच्या विशेष संस्था बनविल्याने अल्पसंख्यांकांचा विकास कसा काय होतो बुवा? हा'विशेष' दर्जा काढला नाही तर ते मुख्य प्रवाहात येतील कसे? तसे झाले नाही म्हणून तर त्यांना आता मराठी शिका असे सांगायले लागते ना?
पोलिस भरती प्रक्रियेत एक अल्पसंख्याक अधिकारी नियुक्त केला जाईल, असे उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांनी ह्या कार्यक्रमात सांगितले
अल्पसंख्याकांचे तुष्टीकरण आणि अनावश्यक लांगूलचालन हेच काँग्रेसचे जन्मापासूनचे धोरण आहे. यातून कुणाला मुस्लिमांचे भले करायचे आहे असे वाटत असेल तर तो केवळ भ्रम आहे. आबा व्यक्ती म्हणून कितीही चांगले असले तरीही त्यांना त्यांच्या पूर्वसूरींची री ओढलीच पाहीजे. मतांचा जोगवा मांडायला तुष्टिकरणाची परडी डोक्यावर घ्यायलाच हवी!
आणि आबांना असे म्हणायचे आहे का की बहुसंख्यांक अधिकारी गुणवत्ता असलेल्या अल्पसंख्याक उमेदवाराला नाकारतात? ( वा! असे असेल तर पोलिस खाते भलतेच'जातीयवादी' आहे!)आणि अल्पसंख्याक अधिकारी अल्पसंख्याक उमेदवाराला गुणवत्त नसताना नेमणूक देईल ?
बिचारे अल्पसंख्यांक!- असल्या भूलथापांना बळी पडून कॉग्रेसच्या मागे जातात आणि भ्रमनिरास झाल्यावर बहकतात देखील! अतिरेक्यांना यापेक्षा भुसभुशीत , मशागत केलेली जमीन कोठून मिळणार ? मुलायम, लालू असल्या तत्त्वशून्य राजकारण्यांची पैदास असल्याच वातावरणात होते.
शहाण्या माणसाने असल्या राजकीय कोलांट्यांची फारशी दखल घेऊ नये, बिचाऱ्यांना खुर्ची टिकवण्यासाठी कीती धडपड करावी लागते, जरा त्यांना दया दाखवूया का?