तेच चांदणे तसाच वारा पुन्हा एकदा
अंगावर ये तोच शहारा पुन्हा एकदा

पहिली ओळ खूप आवडली. शहारा हा शब्द तुम्ही येथे रोमांच या अर्थी वापरलेला आहे. दोन्ही शब्दांच्या अर्थच्छटा तुमच्या तुम्हीच ताडून पाहाव्यात.   :)

आठवांतले कुठे मिळावे तिचे गाव ते
कोण मांडतो जुना पसारा पुन्हा एकदा

वा... वा...!

जेमतेम तो करारनामा पुरा वाचला
तोच वाजला तोच नगारा पुन्हा एकदा

छान... 'तोच'वरील श्लेष आवडला.


मेघ दाटले नीलम-पाचू, तुझे पाहण्या
करी नर्तना, ढाळ पिसारा पुन्हा एकदा

वा...

नाव-गावही वाहून गेल्यावरी आज हे
कोण शोधते तुझा किनारा पुन्हा एकदा

छान...
.........

सतीशराव, तुमच्या गझलेत आता चांगलाच सफाईदारपणा येऊ लागला आहे. कल्पनाही ठीक राबवता येत आहेत. लिहिणे सुरूच ठेवावे.

मनापासून खूप खूप शुभेच्छा.