हा पुरावा पाहून मला अत्यंत आनंद झाला आहे. या पुराव्यामुळे हे सप्रमाण सिद्ध होत आहे की असे झाले होते. ते सिद्ध होत असल्यामुळे माझी आत्तापर्यंतची सर्व जीवनमुल्ये बदलून गेली आहेत. मी आता नेहमीप्रमाणे वागत नाही. नोकरी करत नाही. मुलाबाळांकडे बघत नाही. घोषणा देत रस्त्यांवरून फिरत असतो. माझ्या गरजा आता अत्यंत कमी झाल्या आहेत. मला लवकरच मोक्ष मिळणार याची खात्री वाटायला लागली आहे. कष्ट करून आपल्या घर्राकडे व कुटुंबातील सदस्यांच्या गरजांकडे बघणे याची मला आता गरज नाही. मला भूक लागत नाही. तहान या शब्दाचा तर अर्थच विसरलो आहे. माझे कुटुंब माझ्यातील या अध्यात्मिक बदलांमुळे हरखून गेलेले आहे. वायू भक्षण करून मी आता परमात्म्यात तल्लीन झालेलो असतो. एक मोठ्ठा प्रश्न या पुराव्यामुळे निकालात निघाला आहे. मी तर असे ऐकले आहे की हे वाचणारे सर्वच आता योगी व्हायच्या मार्गावर असून अशा लोकांचा लवकरच एक पंथ निर्माण होईल. अत्यंत परिणामकारक अशी कागदपत्र मिळवल्याबद्दल मिळवणाऱ्याचे अभिनंदन!