स्वाती, अंजली, कोहं धन्यवाद. कोहं, माहिती लिहायची राहून गेली.

दिल्ली ते ऋषीकेश हे अंतर २३० किमी बसने किंवा हरिद्वारपर्यंत रेल्वे तिथून सहा सीटरच्या गाड्या मिळतात.

ऋषीकेश ते जोशीमठ २५० किमी - बस

जोशीमठ ते गोविंदघाट २५ किमी - बस

गोविंदघाट ते घांगारिया १४ किमी - पायी/खेचरं/ पिट्टु/कंडी

घांगरिया ते व्हॅली ऑफ फ्लॉवर्स ४ किमी - पिट्टू

घांगरिया ते हेमकुंड साहिब ७ किमी - पायी/खेचरं/पिट्टू/कंडी

गोविंदघाट ते बद्रीनाथ २५ किमी - बस

बद्रीनाथ ते माना बॉर्डर ४ किमी - बस

माना ते वसुंधरा फॉल्स ४ किमी - पायी

बद्रीनाथ ते ऋषीकेश ३०० किमी - बस

दिल्ली किंवा ऋषीकेष्पासून आपली गाडी/भाड्याची गाडी करून स्वतंत्रपणेही जाता येतं. प्रत्येकठिकाणी राहण्याची सोय हॉटेल्स/धर्मशाळेत सहज होते.

युथ हॉस्टेलतर्फे आम्ही गेलो होतो. ऋषीकेश ते ऋषीकेश दहा दिवस खर्च ३१०० रु. राहण्या-जेवणासहित. बुकिंग मे महिन्यात करावं लागतं.  ९४१५०४२३०७/९४५००२२६६१ संपर्क करू शकता. मुंबईकर असाल तर युथ हॉस्टेल- ०२२-२४१२६००४.

मंजूषा