चौकसराव,
तुम्ही सुचवल्याप्रमाणे हे पुस्तक आणून वाचायला सुरुवात केली.
सध्या रावळपिंडी झाले आहे. :)
मात्र परीक्षणात जाणवणारी एक त्रुटी म्हणजे Dervlaला प्रवासात आलेल्या युरोपियन, अझरबैजानी, पर्शियन, अफगाणी, पाकिस्तानी (कदाचित पुढे भारतीय) विविध संस्कृतींचे अनुभव, त्याबाबतची तिची मते याबाबत आपण विशेष काहीच म्हटलेले नाही. (महिना २० पाऊंडापेक्षाही कमी पैसे कमावणाऱ्या ह्या भागात जर तुम्ही पुरेसे कोडगे/निर्लज्ज असाल तर स्वतःच्या खिशातून एक दिडकीही खर्च न करता शेवटपर्यंत प्रवास करू शकता. वगैरे, वगैरे) एकंदर 'विकास' या कल्पनेविषयीचीही तिची स्वतःची मते फार विचार करण्याजोगी आहेत. (इतर पाश्चात्त्य लेखकांच्या तुलनेत तिने अधिक प्रॅक्टिकल विचार करून ही मते मांडली आहेत असे वाटते.) उदा. पाकिस्तानातील एका तरूणाने आईने पसंत केलेली मुलगी आवडली नाही म्हणून ती नाकारल्याच्या प्रसंगावरची टिप्पणी पाहा, किंवा हरात आणि रावळपिंडी या शहरांची तुलना.
मलाही काश्मीर प्रश्न, ब्रिटिशांचे उपखंडातील 'योगदान' आणि कॅथलिक-प्रोटेस्टंटांबाबतची मते 'पाश्चिमात्य' वाटली.
आता हिमालयात प्रवास सुरू झाला आहे. (गिलगिट पासून पुढे... बघू काय होतं ते.) आणि मीदेखील पुरवून पुरवून वाचत आहे. :)
अर्थात वर म्हटल्याप्रमाणे तुम्ही सुचवले नसते तर हे पुस्तक एरवी वाचलं नसतं. (माझ्याकडच्या प्रतीचे पिवळसर मुखपृष्ठ फारच अनाकर्षक आहे आणि त्याची छपाईही (की मुद्रण ;) ) फार मोठ्या टाईपातली आहे. त्यामुळे माहीत नसताना हे पुस्तक नक्कीच उचलले गेले नसते.)
या पुस्तकाबद्दल लिहिल्याबद्दल धन्यवाद.