नवीन सून जेव्हा घरी येते.. तेव्हा तिच्याकडून नवीन पद्धती शिकून घेईल अशी अपेक्षा केली जाते... आताच्या ह्या युगात मुलींकडून अश्या अपेक्षा योग्य आहेत का? >>
हो आणि तशा अपेक्षा नैसर्गिकच नव्हेत का?

तिच्या माहेर कडून आलेल्या सगळ्या पद्धती ती एकाएकी कशी टाकून देईल?? अशी अपेक्षा तिच्याकडून का करावी?? >>
नाही ती एकाएकी जुन्या पद्धतींचा त्याग करू शकणार नाही. तिच्याकडून तशी अपेक्षा करू नये.

आणी तिने तसे नाही केले तर तिला अन माहेर च्या माणसांना बोल लावले जातात... हे योग्य आहे का?
नाही. असे केले जात असेल तर ते योग्य नाही.

मात्र, नव्या घरात आल्यानंतर सुनेला वेगाने आसपासच्या वातावरणाशी जुळवून घ्यावेच लागते.
त्यासाठी कित्येक अनपेक्षित मदतीही मिळत असतात. विशेषतः नवऱ्याकडून. त्यांचा सदुपयोग करून घ्यावा.