साधना म्हणतात की :
मुलाच्या संपत्तीवर वडीलांचा हक्क आहे. - ह्याचा फायदा जावयाला मिळणार असा निष्कर्ष काढणे याला बादरायण संबंध म्हणतात. आणि जर जावयाला मिळालाच तर मग हा कायदा स्त्रीधार्जिणा कसा ठरतो?
माझे स्पष्टीकरण असे की :
एका पारड्यात मुलगा (सूनेसहीत किंवा रहीत) आणि एकीकडे मुलगी (जावयासहीत किंवा रहीत) घेतले तर, कोणताही कायदा हा मुलगी (जावयासहीत कींवा रहीत) या पारड्यातच झुकते माप (आणि झुकते पैसे) टाकतो, असे मला म्हणायचे आहे. म्हणजेच मुलगा आणि मुलगी यापैकी मुलगी धार्जिणा म्हणजेच स्त्रीधार्जिणा...