आधिच्या पिढितिल सुना १८ व्या वर्षी सासरी येत असत. आता सरासरी किमान २३- २४ व्या वर्षी वा त्याहुनही अधिक वयात मुलिंची लग्ने होतात. तसेच शहरा शहरान्मध्ये राहणिमानाचा काही नि काही फरक हा असतोच. पण आपली मते बरोबर आहे हे मत आजकालच्या सुना अधिकच ठामपणे सांगू शकतात. कोवळ्या वयात सासरी येणे हे दोन्ही बाजुने चांगले आणि वाईट हि आहे. हा वयोमानाचा फरक लक्षात घेउन हि चर्चा पुढे चालवावी अशी माझी विनंती आहे.