स्वामीयोगेश, आपला हा विचार थोडा एकांगी वाटला.

आपण हाही विचार करून पाहिला पाहिजे की मुंबईइतके कॉस्मोपॉलिटन शहर भारतात कोणतेही नाही. इथे विविध सामाजिक आर्थिक धार्मिक स्तरांतील लोक राहतात. इथला ग्राहक संख्या आणि वैविध्य या बाबतीत स्वयंपूर्ण आहे. त्यामुळे कोणतीही नवी गोष्ट सुरू करताना जे स्टॅटिस्टिकल (सांख्यिक) सर्वेक्षण करावे लागते त्याकरिता हा समाज अगदी योग्य आहे.

मुंबईकर हा नवी गोष्ट चोखाळून बघणारा आहे त्यामुळे त्याला काय रुचते हे माहित असणे कोणत्याही उत्पादकास लाभदायकच असणार. कारण "मुंबईत फेमस आहे" असं बाहेरच्या गिऱ्हाइकाला सांगितल्यावर त्याचा परिणाम बहुतांश वेळा वस्तूच्या विक्रीत होतो ही गोष्ट नाकारून चालणार नाही.

बळी पडण्याविषयी म्हणाल तर जे काही नवे येते ते आंधळेपणाने स्वीकारलेच गेले तर बळी गेला असे म्हणता येईल. त्यातले काही सपशेल नाकारलेही जाते, काही बाबतीत बदल होतात असे असेल तर उगाचच आपण बळी पडलो असा समज का बरं करून घ्यावा?

त्यापेक्षा मुंबई ट्रेण्डसेटर आहे असे विचार का करू नये? मुंबईवर होणारे हे प्रयोग आपण अमान्य केले तर तिचे हे ट्रेण्डसेटरपण नाहीसे होईल. मुंबईला इतरांचे अनुकरण करायची वेळ येईल, स्वतः प्रथम पडताळा घेण्याऐवजी इतरांच्या मतांवर अधिक अवलंबून राहावे लागेल.... (ही जरा अतिशयोक्ती होतेय याची मला कल्पना आहे  पण मुद्दा लक्षात घ्या.)