मुंबईत एकदा "बांधाबांध व स्थानांतरण" ह्या मंडळींनी मला जकात म्हणजे काय ते कळणार नाही असा विचार
करून जकात पावती स्वत:च्या हातात ठेऊन सांगितले होते, "बेटी पापा को बुलाके लाव, हमे एक जगह कुछ
पैसे भरने पडे उसके बारे मे बताना है ।"
मला आधी जाम हसू आले, वाटले सांगावे की जकात नाक्यावरून माझे अनेकदा येणे जाणे झाले आहे,
जकात खात्यात अनेक ओळखीची मंडळी पण आहेत.
पण नंतर वाईट वाटले की ह्या समाजात पैश्याच्या व्यवहारात बायकांना कळत नाही हा समज किती
खोल रुजला आहे.
असो. लेख आवडला. विशेषत: -
घरं बदलायची वेळ आली की औषधांच्या दुकानातून मोठी रिकामी खोकी आणायची आणि दणादण त्यात वस्तू
भरत सुटायचं हीच इतक्या वर्षांची सवय. सगळ्या वस्तू कोंबून त्या खोक्यांची तोंडं सेलोटेपने बंद केली की
माझ्या नवऱ्याच्या चेहेऱ्यावर कसं कर्तव्यपूर्तीचं समाधान झळकायचं!
अशी रोजच्या अनुभवातील साधी सुधी वाक्ये...
अजून भरपूर लेख येऊ देत. पु. ले. शु.