हे प्रकरण जसे ऐतिहासीक सत्य नसून शिवभक्तीखातर रचली गेलेली एक कथा आहे हे 'शिवछत्रपती' हे श्रद्धस्थान असलेल्या सर्व मराठी माणसांनी सहज स्विकारले. कारण मा. श्री. बाबासाहेब पुरंदरे यांच्या सारख्या अनेक व्यासंगी इतिहासकारांनी असे ठामपणे सांगितके की अशा आशयाचा कोणताही दस्त ऐवज उपलब्ध्य नाही वा अनुषंगिक पुरावेही नाहीत.

या पत्राच्या निमित्ताने स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जगप्रसिद्ध उडीबद्दल असे पुरावे समोर आले. मा. कौंतेय व सृष्टिलावण्या यांचे अनेक आभार.

माझा आक्षेप दोन प्रकारे होता. एकतर एका असामान्य व्यक्तिबद्दल असे लिहिणे - तेही कुठचा पुरावा ज्ञात नसताना व असलेले पुरावे दुर्लक्षित करुन. दुसरे असे की लेखकाला असे काही अगाध ज्ञान होते व त्यातही कै. डॉ. य. दिंचा संबंध जोडायचा होता तर हा उपदव्याप लेखक महाशयांनी डॉ. साहेबांच्या हयातीत का केला नाही.

असो. मुशीत तापून सोने कसोटीला उतरले!

सर्वांचे चर्चेतील सहभागाबद्दल आभार.