काल रात्री सह्याद्री वाहिनीवर प्रसारित झालेल्या 'अमृतवेल' कार्यक्रमाअंतर्गत 'गजलरंग' मध्ये चित्तरंजन भट 'चित्त' यांनी आपल्या गजला सादर केल्या. 'का चुकार हळव्या' ही गजल त्यांनी तरन्नुममध्ये सादर केली . 'तुझे माझे नाते राहिले घसाऱ्यासारखे' ही दुसरी सुरेख गजलही त्यांनी सादर केली. चित्त यांच्या या गजला आणि त्यांचे सादरीकरण यांनी प्रेक्षकांना आणि सहकारी गजल सादरकर्त्यांनाही सुरेशबाबूंची आठवण झाली. अर्थात चित्त यांचे स्वतःचे वेगळेपण त्यात आहेच.
चित्त यांचे अभिनंदन आणि त्यांच्या पुढील वाटचालीला शुभेच्छा.
संजोप राव