राजबाबत मला माहीत नाही, हे खरे आहे. आपल्याइतकी नक्कीच नाही. त्याचे आंदोलन योग्य आहे, जरूर आहे.
परंतु आपण माझे वाक्य अर्धवट उद्धृत करून इतर वाचकांचा जो गैरसमज करून देत आहात त्याबद्दल मात्र आक्षेप आहे. पूर्ण वाक्य असे आहे:
पडेल ते काम आणि मिळेल तो पैसा अश्या पद्धतीने जगणे, कशातही कमीपणा न मानणे, आणि जरासुद्धा माज न करणे, वरिष्ठांचे आणि बलिष्ठांचे लांगूलचालन करणे हे किती मराठी माणसांना जमणारेय? बिहारींना हे जमतं म्हणून त्यांचं कुठेही जमतं आणि फावतं!
आणि याचा संबंध त्यांच्या कमी पैशात काम करण्यास तयार होण्याशी आहे हेही स्पष्ट करू इच्छिते. हे खरे आहे म्हणूनच बिहारी लोकांचा प्रश्न अतिक्रमणाच्या पातळीला जाऊन पोहोचलेला आहे, असे वारंवार राज आणि राज-समर्थक म्हणत असतात अशी माझी समजूत आहे. परंतु अधिक माहिती आपण अवश्य द्यावी.
गुजराथी लोकांच्या आगमनामुळे मुंबईतून मराठी माणूस जवळ जवळ हाकलला गेला हेही सत्यच आहे की! गेल्या ५० वर्षांत मुंबईत वारंवार उसळणाऱ्या महागाईला गुजराथी लोकांची मराठी लोकांपेक्षा अधिक सरस असलेली क्रयशक्ती जबाबदार नाही असे आपण म्हणू शकाल का?
दक्षिणी लोकांनी येथे येऊन खाद्यव्यवसाय काबीज केला. मराठी व्यावसायिकांना खाद्यपदार्थांचा संच बदलावा लागला. आपण नेहमीच पाहतो की महाराष्ट्रातील गुणी उमेदवारांना नोकऱ्या मिळत नाहीत याचे एक कारण साध्या "दक्षिणी" ओळखीच्या बळावर त्या दाक्षिणात्यांना मिळतात. यात उच्चपदांचा समावेश प्रमुख आहे.
महाराष्ट्रातील सुतार व्यवसायावर राजस्थानचे अधिराज्य आहे की बिहारचे?
राजचा मुद्दा आणि आंदोलन योग्य आहे असं जरी मान्य केलं तरी ते एकांगी आहे असं आपल्याला नाही वाटत? मग हे एकांगी का तर नरेंद्र मोदी! असं मला वाटतं. राजच कालचं पोर आहे त्याच्यापुढे! (नॅनोचा प्रकार माहितीये ना?) नरेंद्र मोदी भडकला तर गुजराथेतलेच नव्हे तर मुंबईचेही गुजराथी रस्त्यावर उतरतील आणि ती परिस्थिती राजच्या हाताबाहेर जाण्याची शक्यता जास्त आहे. शिवाय गुजराथी आणि दक्षिणी लोकांवर मुंबईची अर्थव्यवस्था उभी आहे. ती कोलमडली तर राजला पैसा कसा (कमवता आणि खाता) य्येईल?
यासंदर्भात झी मराठीवर घडलंय बिघडलंय मध्ये खूप सुंदर मांडणी झाली होती. मराठी लोक प्लंबिंग, सुतारकाम, दुरुस्तीची कामे, इलेक्ट्रिशिअनची कामे, भेळपाणीपुरीची गाडी चालवणे, रस्त्यावर वस्तू विकणे, दुधाचा रतीब घालणे वगैरे कामे कमीपणाची समजतात आणि म्हणून या व्यवसायांच्या निमित्ताने भैया मोठे झाले, खूप झाले, असं त्यांचं म्हणणं होतं. हे ५०% तरी खरं आहे ना. आधी सोयीचे वाटले आणि आता मात्र अति झालं असं आहे ना!
पाण्याला वेळीच अडवलं तर तर ते अडतं. पूर अल्यानंतर पाणी मागे ओढून अडवता नाही येत! राज तेही करून दाखवेल किंवा किमान त्याची दिशा तरी देईल असे आपणांस वाटत असेल तर शुभेच्छा. तसे झाले तर पाहू पुढे काय ते.
दुसरं असं की या आंदोलनाच्या बळावर राज निवडून आला मुख्यमंत्री झाला तर पुढे काय? भारताच्या राज्यघटनेच्या विरोधात जाणारे निर्णय घेऊन फक्त मराठी माणसांना नोकरी तो देऊ शकणार आहे? सध्या महाराष्ट्रात स्थायिक असलेल्या असंख्य बिहारींना (किंवा खरंतर सर्व परप्रांतीयांना) तो घालवून देऊ शकणार आहे? समजा दिलंच घालवून तर गरजेच्या प्रत्येक ठिकाणी प्रत्येक कामाला मराठी माणूस स्वेच्छेने तयार होणार आहे? सांगा किती मराठी माणसं समाजाची गरज म्हणून टॅक्सी चालवतील? ठेले चालवतील? हा फार पुढचा आदर्शवादी विचार झाला, आपण साधा विचार करू. यातून हुकुमी रोजगार्निर्मिती होईल का? या प्रश्नाचे उत्तर ढगात आहे!
मुळात आधी निवडणुकीनंतर काय हा प्रश्न काळाला सोडवू दे. मग बघू!