चैत, हे बरोबर! बऱ्याच आठवणींना उजाळा मिळाला या चर्चेच्या आणि तुझ्या प्रतिसादाच्या निमित्ताने लहानपणीच्या देवा चांगली बुद्धी दे पासून ते लग्न विधिवत करायचं का "विधि"वत याबाबतच्या मी घातलेल्या वादापर्यंत! काय खरं आणि काय बरं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे पण मला पटलं. एक मात्र आहे. आपल्या डोईजड झालेली गाठोडी ठेवायला कोणी देवाची खुंटी केली तर मन हलकं होतं ना त्याचं! हा प्रश्न कसा सुटणार?