हे सगळी इंटरनेटवर मिळणार्या स्वातंत्य्राची आणि वेडेवाकडे लिहून चटकन लक्ष वेधून घ्यायच्या वृत्तीची कमाल आहे, असे मला वाटते.

हे एकदम पटले. मात्र अशा बेजबाबदार लेखनाला काही लोक बाणेदारपणा आणि बुद्धिमत्ता समजतात त्याला काय करणार? लिहिणाऱ्याला तेवढेच हवे असते. ऍनिमल फार्ममधल्या गोंधळाला जसे डुकरांचे योगदान होते तसे तिथल्या मेंढरांचेही होतेच ना! त्यामुळे बाणेदारपणा कुठला आणि हलकटपणा कुठला हे त्यांना कुणीतरी दाखवून द्यायलाच लागते. ते काम सर्वसाक्षींच्या मटाला पत्र लिहून खडसावण्याने साध्य होईल. पण असे कुठे कुठे करत राहणार.