हार्दिक अभिनंदन, चित्तरंजन!
दिवसेंदिवस असेच यश तुला मिळत राहो.
मला माहीत आहे की, तुला असल्या गोष्टींमध्ये तसे स्वारस्य नसते; पण आमच्या जवळच्या, आमच्यात वावरणाऱ्या, आमच्या आसपास वावरणाऱ्या एका कवीच्या रचना एकाच वेळी अनेकजण घरोघरी ऐकत आहेत, त्यांचा आनंद घेत आहेत, दाद-प्रतिसाद देत आहेत... हे सारे पाहून होणाऱ्या आनंदाची कोटी कोणती? हा आनंद निखालस अत्युच्च कोटीचाच!
सकस, दर्जेदार, खणखणीत गझल म्हणजे काय, हे पाहायचे असेल तर चित्त यांच्या गझलांना पर्यायच नाही....
पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन... असाच पुढे जात राहा...